⬜⬜विशेष लेख⬜⬜
स्वातंत्र्याची पहाट !
भारत माझा देश महान!!!
हे म्हणण्या आधी इंग्रजी सत्तेने कपटाने भारत देशाला कवटाळले होते. आमचे ज्ञान, संस्कृती नायनाट करायचा प्रयत्न सुरु केला भेदभाव निर्माण करून प्रदीर्घ काळ राज्य केले…
पण हळूहळू जनता जागृत होत गेली तेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्यासाठी उठाव १८५० मध्ये केले.. त्यात लोकमान्य टिळकांनी देशभर जन जागृती करून संपूर्ण स्वराज्य मागितले. महात्मा गांधींनी तर चळवळीला अहिंसा… असकाराचे अधिष्ठान देत सविनय कायदेभंगाचा लढा सुरु केला. तर दुसरीकडे चाफेकर बंधू…. भगतसिंग… सुखदेव… राजगुरू… मदनलाल.. अश्या शेकडो क्रांतिकारंनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी करून थेट युद्धच सुरु केले. अश्याप्रकारे प्रत्येक इंग्रजांना लढा देत आव्हान दिले. त्यातच शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता!!
देशभर स्वातंत्र्य प्राप्तीचे यज्ञकुंड धगधगत होते….
अखेर संपली बलिदान परीक्षा स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या पहाटेच्या सूर्य लालीचे तेज लोकांना शब्दात व्यक्त करता येत नव्हते… अशी आनंदमय प्रभात झाली. पक्षांनीही चिवचिवाट सुरु केलास्वातंत्र्याचा हर्ष मावेना… त्या वातावरणात इंग्रज सरकारला देश सोडून जाणे भाग पडले.आता प्रतीक्षेत होते इंग्रज युनियन जॅक उतरून भारताचा स्वाभिमानाचा… अस्मितेचा तिरंगा ध्वज केव्हा फडकणार!!!
तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ भारतात झेंडा फडकला अखेर सुवर्ण दिन उगवला
भारत मातेला परदास्यशृंखलेतून मुक्त करतांना सर्वांना स्फूर्ती देणारा एकच मंत्र होता तो म्हणजे ” वंदे मातरम ”
🟪सौ. शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका सावली
