• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिला छायाचित्र संग्रह भेट!
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर येथे “देवाभाऊ जनसेवा सप्ताह” हा विशेष सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, धार्मिक आणि आरोग्यवर्धक कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये रक्तदान शिबिर, शाळेकरी विद्यार्थिनींना सायकल वाटप, महाआरती, महाआरोग्य शिबिर, शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, डिजिटल क्लासरूम, रोजगार मेळावा, संगणक वाटप यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश होता. या माध्यमातून थेट जनतेला लाभ देत सेवा कार्य पार पाडण्यात आले.
या सर्व उपक्रमांचा एक विशेष छायाचित्र संग्रह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट स्वरूपात देण्यात आला. यावेळी त्यांनी या उपक्रमांचे कौतुक करत, अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
