• चंद्रपूरात स्वातंत्र्य दिन थाटात साजरा!
• रिपाई आठवले गटाच्या वतीने मिठाईचे वाटप !
• जिल्हाध्यक्ष गौतम तोडेंची उपस्थिती
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर शहरात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम थाटात पार पडला.
दरम्यान येथील मुख्य मार्गावरील स्थानिक आंबेडकर चौकात दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
या वेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे,शहर अध्यक्ष संदिप जंगम महिला शहराध्यक्ष अश्विनी रायपूरे,अमर वाकडे, शर्मिला मडावी,अक्षरा मडावी,वासू नादूरकर,साहिल रायपूरे,चंदू राऊत गिता साखरे व रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
