Home Breaking News • चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम! • कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके...

• चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम! • कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके यांची उपस्थिती

176

• चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम!

• कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके यांची उपस्थिती

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदयांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा समारंभ मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले, ज्यातून देशप्रेम, ऐक्य आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अभिमानाने साजरा करत शहीद वीरांना विनम्र अभिवादन केले. देशाच्या प्रगती, एकात्मता आणि सुरक्षिततेसाठी योगदान देण्याचा संकल्प सर्वांनी केला आणि स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाचा उत्साह, अभिमान व आनंद एकत्र अनुभवला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!