चिमूरात बेवारस कुत्र्यांचा हैदोस !
तरुणीला घेतला चावा !
चंद्रपूर⬜ किरण घाटे ⬜
चिमूरात सध्या बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून त्यांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा अशी सर्व सामान्य जनतेमधून मागणी जोर धरू लागली आहे.
चिमूरच्या टिळक वार्डात बेवारस कुत्रे दिवसरात्र फिरत असतात.अश्यातच आज टायपिंग इन्स्टिट्यूटला एक तरुणी जात असताना एका बेवारस कुत्र्याने चावा घेतल्याची घटना सकाळी घडली.या घटनेमुळे शाळेकरी विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित विभागाने सदरहु घटनेची दखल घेत त्वरित या बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा !
