Home Breaking News #Ballarpur • बल्लारपूर पोलिसांचे पोळा, गणेशोत्सव सन्ना निमीत्त रूट मार्च व मॉब...

#Ballarpur • बल्लारपूर पोलिसांचे पोळा, गणेशोत्सव सन्ना निमीत्त रूट मार्च व मॉब ड्रिल

92

#Ballarpur
• बल्लारपूर पोलिसांचे पोळा, गणेशोत्सव सन्ना निमीत्त रूट मार्च व मॉब ड्रिल

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

बल्लारपूर : पोळा व गणेशोत्सव सणांच्या वेळी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी बल्लारपूर पोलिसांकडून रूट मार्च तसेच मॉब ड्रिल घेण्यात आली.

रूट मार्चची सुरुवात बल्लारपूर पोलीस स्टेशनपासून करण्यात आली. त्यानंतर रेल्वे चौक, जुना बसस्टँड, मुख्य मार्ग, पत्ता गोदाम व गौरक्षण वॉर्ड या प्रमुख भागातून रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चनंतर गौरक्षण वॉर्डातील स्टेडियमवर मॉब ड्रिल घेण्यात आली.

सदर रूट मार्च व मॉब ड्रिल पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, अभिषेक जंगमवार, सौरव साळुंखे, गजानन डोयफडे, पोलीस   उपनिरीक्षक भास्कर कुंदावार, मनोहर मडावी यांच्यासह तब्बल ५० पोलिस कर्मचारी उपस्थित होते.