Home Breaking News सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेंच्या प्रयत्नांमुळे तुकुम भागातील पाणीटंचाई दूर

सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेंच्या प्रयत्नांमुळे तुकुम भागातील पाणीटंचाई दूर

163

सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेंच्या प्रयत्नांमुळे तुकुम भागातील पाणीटंचाई दूर

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : तुकुम परिसरात गेल्या 8 ते 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेसह त्यांची टीम मसीहा ठरली आहे. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी अभिषेक आणि त्यांच्या टीमने तत्परता दाखवत मदीना मस्जिद आणि सावित्रीबाई फुले परिसरात सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

सातत्याने पाण्याच्या कमतरतेला सामोरे जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि अभिषेक डोईकडे व त्यांच्या टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांनी केवळ त्यांच्या त्वरित कार्याचे कौतुक केले नाही, तर त्यांच्या सामाजिक कार्याप्रती समर्पण आणि समाजसेवेला व जिद्दीलाही सलाम केला. स्थानिक रहिवासी संजय मासिरकर म्हणाले, “अभिषेक आणि त्यांच्या टीमने आमच्या अडचणी समजून तात्काळ काम केले. असे तरुण समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”

हा उपक्रम केवळ तुकुम परिसरातील नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला नाही, तर सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक जबाबदारीतून कोणत्याही समस्येचे निराकरण शक्य आहे, हेही दाखवून दिले. अभिषेक डोईकडे आणि त्यांच्या टीमचा हा प्रयत्न निश्चितच इतरांसाठी एक आदर्श ठरला आहे.