Home Breaking News तळोधी बा. पोलिसांची मोठी कामगिरी! घरफोडी प्रकरणातील ८ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत...

तळोधी बा. पोलिसांची मोठी कामगिरी! घरफोडी प्रकरणातील ८ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलेला सोने-चांदीचे दागीने मुद्देमाल फिर्यादी यांना हस्तांतरण बाबत..

142

• तळोधी बा. पोलिसांची मोठी कामगिरी! घरफोडी प्रकरणातील ८ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

• केलेला सोने-चांदीचे दागीने मुद्देमाल फिर्यादी यांना हस्तांतरण बाबत..

सुवर्ण भारत:रोशन खानकुरे चंद्रपूर
मो. 88882 03020

पोलीस स्टेशन-तळोधी बा. येथे दाखल असलेल्या एकुण ०५ घरफोडीच्या अपराधामधील आरोपी कडुन हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल सोने-चांदीचे दागीने (सोने १०८.६७० ग्रॅम व चांदी १०२.६०६ ग्रॅम असा एकुण किमंत ८,००,०००/- रू. (अक्षरी आठ लक्ष) चा किंमती मुद्देमाल मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, ईश्वर कातकडे सा. अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, याचे मार्गदर्शनाखाली दिनांक १३/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन तळोधी बा. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव उपविभाग, ब्रम्हपूरी यांचे हस्ते न्यायदंडाधीकारी, प्रथम वर्ग, न्यायालय, नागभीड यांचे आदेशान्वये जप्तीपत्रकानुसार गुन्हयातील फिर्यादी नामे ०१) दानोदास वातुजी भाकरे रा. आकापूर, सोनुदास वातुजी भाकरे रा. आकापूर, श्रीमती सुधाबाई भीमराव मेश्राम रा. ओवाळा, कुणाल हरीचंद्र गहाणे रा.आकापूर, महादेव देवाजी इंदूरकर रा. धामणगाव चक, जीवन किसन बोरकर रा., जीवनापूर, सर्व ता. नागभिड जि. चंद्रपुर यांना हस्तांतरीत करण्यात आला.

सदर वेळी पोलीस स्टेशन तळोधी बा. चे ठाणेदार राहुल गुहे सा. तसेच गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउपनि किशोर मानकर पोउपनि चंद्रकात लांबट पोलीस हवालदार रत्नाकर देहारे तसेच मुद्देमाल मोहरर पोहवा. विजय वाकडे व ईतर पोलीस अंमलदार हे हजर होते.