Home Breaking News भाऊ – बहिणींच्या नात्यासह क्षेत्र विकासासाठी झटणारा बंटीभाऊ सच्चा जनसेवक – नूपुर...

भाऊ – बहिणींच्या नात्यासह क्षेत्र विकासासाठी झटणारा बंटीभाऊ सच्चा जनसेवक – नूपुर शर्मा तुमच्या बंधुप्रेम व ऋणानुबंधाचा मी सदैव ऋणी – आ. कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया

100

• भाऊ – बहिणींच्या नात्यासह क्षेत्र विकासासाठी झटणारा बंटीभाऊ सच्चा जनसेवक – नूपुर शर्मा

तुमच्या बंधुप्रेम व ऋणानुबंधाचा मी सदैव ऋणी – आ. कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया

सुवर्ण भारत :रोशन खानकुरे प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : समाजसेवेचा वारसा घेत राजकारणात क्षेत्र विकासासह लाखो महिलांच्या रक्षणाची जबाबदारी अंगिकारून बहिणींच्या हृदयात स्थान निर्माण करणारा व त्याच्या प्रेमापोटी रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहून पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या सर्व बहिणी आपले बंधु – भगिनी प्रेम बघुन मी पूर्णतः भारवून गेले असून बंटीभाऊ सारखा सहहृदयी व प्रिय असा आमदार हा नशिबाने भेटतो.बंटी भाऊंचे समाजकारण वाख्यानाजोगे असून बंटी भाऊ हा सच्चा जनसेवक आहे.असे प्रतिपादन भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या तथा प्रखर नेत्या नूपुरताई शर्मा यांनी केले. त्या नागभीड येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपच्या पूर्व राष्ट्रीय प्रवक्त्या तथा प्रखर नेत्या नूपुरताई शर्मा, चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया, अपर्णाताई भांगडिया, मेघाताई भांगडिया, वंदना मेश्राम,जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, कृष्णाजी सहारे , डॉ.आमिर धम्मानी, उमाजी हिरे,भाजप नागभीड पदाधिकारी गणेश तर्वेकर,तालुका अध्यक्ष संतोष रडके, आवेश पठाण, संजय गजपुरे,महिला आघाडी अध्यक्ष इंदूताई आंबोरकर, रोहित बोम्मावार,गजानन पाथोडे, सचिन आकुलवार,होमदेव मेश्राम, राजू देवतळे,भाजप नागभीड मनोज लडके, विलास विखार, यशवंत दिघोरे,चिमूर अध्यक्ष राजु झाडे, तळोधी मंडळ अध्यक्ष हेमराज लांजेवार, चिमूरचे मनीष तुम्पल्लीवार, निशिकांत बोरकर,यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित महिला भगिनींना संबोधित करतांना चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया म्हणाले की, देशासह राज्यात भाजप सरकारकडून महिला सक्षमीकरण व महिला भगिनींची प्रगती व सुरक्षिततेसाठी सरकार अविरत कार्य करीत आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांप्रती सकारात्मक व सदैव प्रयत्नशील असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवाभाऊ अहोरात्र मेहनत घेत आहेत.लवकरच गोसेखुर्दचे पाणी घोडाझरीत आणून क्षेत्रात हरितक्रांती घडविण्याचे मी वचन देतो. आपला दरवर्षी मिळणारा आशीर्वाद हा नवी प्रेरणा देणारा असून माझ्या पाठीशी आपण खंबीर उभे आहात हीच माझी खरी संपत्ती आहे.मी तुमच्या विश्वासावर सदैव खरा उतरून मातृशक्ती सेवा व क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणार. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप नागभीड महिला आघाडी अध्यक्षा इंदुताई आंबोरकर , सूत्रसंचालन शरयू चेरकुरे यांनी केले तर आभार योगिता पाथोडे यांनी मानले. आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास नागभीड तालुक्यासह परिसरातील हजारोंच्या संख्येने महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागभीड भाजप तालुका पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.