Home Breaking News #Ballarpur प्रा.सतीश कर्णासे आचार्य पदवीने सन्मानित : अनेकांनी केले कर्णासे यांचे अभिनंदन!

#Ballarpur प्रा.सतीश कर्णासे आचार्य पदवीने सन्मानित : अनेकांनी केले कर्णासे यांचे अभिनंदन!

55

#Ballarpur

प्रा.सतीश कर्णासे आचार्य पदवीने सन्मानित : अनेकांनी केले कर्णासे यांचे अभिनंदन!

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

#बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील मराठी विभाग प्रमुख सहायक प्राध्यापक सतीश
सहदेवराव कर्णासे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला होता.”१९९० नंतरच्या साहित्य अकादमी पुरस्कृत मराठी कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास”हा त्यांच्या संशोधण्याचा विषय होता. मार्गदर्शक म्हणून तायवाडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महादुला, कोराडी येथील प्रा. डॉ.कोमल वी.ठाकरे लाभले होते. मौखिक परीक्षेला परीक्षक म्हणून एस. एन. डी. टी. विद्यापीठ मुंबई येथील प्रा. डॉ. सुनील रामटेके उपस्थित होते.
आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय सू.कायरकर, उपाध्यक्ष राजु चिताडे, अंकित कायरकर, डॉ.रजत मंडल प्रभारी प्राचार्य तसेच महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.