Beed Dist @
मराठा आरक्षण व शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारचां निषेध—
आष्टी तालुक्यातील मौजे सुलेमान देवळा येथे बैलं पोळा सण आगळावेगळा साजरा—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
80 87 17 57 12
हिंदू संस्कृतीचा व शेतकऱ्याचा पवित्र सण असणाऱ्या पोळ्याच्या सणानिमित्त, आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमान देवळा परिसरातील समविचारी मित्र परिवार एकत्र येत मराठा आरक्षण विषयी राज्य सरकारची असणारी उदासीन भूमिका व शेतकऱ्याच्या मालांला मिळत नसलेलां भावाचा निषेध व्यक्त करत बैलं पोळा सण साजरा केला.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण ओ.बी.सी. प्रवर्गातून मिळण्यासाठी मराठा योद्धा माननीय श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात खाली सकल मराठा समाज 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलना साठी जात असून, राज्य सरकारने याची दखल घ्यावी. सकळ मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने यावे हा एक संदेश या माध्यमातून देण्यात आला असून , कोटीच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे जानार आहे.असा संकल्प यावेळी करण्यात आला .
आज शेतकऱ्याकडे पाहण्याची सारकारची भूमिका योग्य नसून, कोणत्याही शेतीमालाला भाव नाही , हमी भाव देतो म्हणून सतेतं आलेल राज्य सरकारने सर्वच पिकाचे भाव कोलमोडून टाकले . शेतकरी पूर्ण निस्तानांभूत करण्याचा पाप राज्य सरकार करत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सतेतं आलां नंतर शेतकऱ्याची कर्जमाफी न केल्याचा निषेध या प्रसंगी करण्यात आला . तसेच शेतकऱ्याच्या कांदा पिकाला भाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालंत शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून राज्य सरकारचा तीव्र घोषणाबाजी करतं निषेध केला . राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बसणरां आमदार यांना भ्रष्टाचार किती करावा याचे भान सुदा राहिले नाही . आमच्या बैलांलां किती खावं याचं भान आहे . मात्र सायकरच्या तिजोरीतील पैशाचा किती भ्रष्टाचार करावा याचं भान लोकप्रतिनिधींना नाही , असा प्रश्न या प्रसंगी समाजसेवक श्री. परमेश्वर घोडके यांनी उपस्थित केला .
या प्रसंगी युवा नेते धुळाजी लकडे , पत्रकार शौकत पठाण , अशोक माने , महादेव लकडे , शंकरराव घोडके , ईश्वर ओव्हाळ , अमजद शेख , प्रेम पवळ आदी समविचारी मित्रपरिवार , शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते .
