नारंडा गावात पहिल्यांदाच हर्ष आनंदाने तान्हा पोळा नंदी बैल सजावट स्पर्धा संपन्न
सुवर्ण भारत : मनोज गोरे
प्रतिनीधी, चंद्रपूर
कोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा गावा मध्ये पहिल्यादांच आदर्श श्री ,गुरुदेव सेवा मंडळ नारंडा, आदर्श क्रीडा मंडळ नारंडा द्वारा आयोजित तान्हा पोळा नांदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
तान्हापोळा हा सण बाळगोपाळांच्या विरंगुळ्यासाठी व महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासण्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे.
या ठिकाणी सर्व गावातील लोक महिला,पुरूष, युवक युवती, सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हजारो लोक संख्या नी हजेरी लावली आहे . नारंडा गावात तान्हा पोळा नंदी बैल सजावट या स्पर्धा साठी उकृष्ट प्रतिसाद मिळाला आहे
या ठिकाणी उपस्थित गावातील प्रथम नागरिक अनुस्या ताजने सरपंच, बाळा पावडे उपसरपंच, नरेश परसुटकर पोलीस पाटील, मिलिंद ताकसांडे ग्रा. प. सदयक्ष अनिल शेंडे सदयक्ष, किशोर बोधे देवस्थान समितीचे अध्यक्ष, प्रदीप पंदीलवार देवस्थान समितीचे सचिव, संदीप गमगामवार सामजिक कार्यकर्ते, अमर राठोड नारंडा बीट जामदार कोरपना पोलीस स्टेशन, मान्यवर उपस्थित होते
