Home Breaking News सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांचे एक मनोगत!

सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांचे एक मनोगत!

301

सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांचे एक मनोगत!

चंद्रपूर : प्रियंका गायकवाड

नागपूरच्या समाजसेविका व योगशिक्षिका मायाताई कोसरे यांचे मनोगत आम्ही त्यांच्या शब्दात या ठिकाणी देत आहोत.काल त्या एका कार्यक्रमात चंद्रपूर मुक्कामी आल्या होत्या.समाजसेविका कोसरे या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक मुख्य मार्गदर्शिका आहेत.

शहरातील तुकुम- ताडोबा या मुख्य मार्गावरील राजवाडा हाँटेलमध्ये रविवारी दि.
दिनांक 24-8-2025 ला संध्याकाळी रमेशजी ददगाल यांचा 75 वा वाढदिवस व अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.मी ही त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष हजर होती.
सामाजिक ,कला ,क्रीडा,संगीत , साहित्यिक, शैक्षणिक,व राजकीय क्षेत्रातील उपस्थित पाहुणे मंडळींनी त्यांना या वेळी भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.हा भव्य दिव्य सोहळा बघत असताना माझं मन भरुन येत होते.
त्यांचा जीवन प्रवास म्हणजे जणू अग्नी परीक्षाच! पत्नीचे आजारपण त्यातच दोनही पाय गमावलेल्या! त्या नंतरही त्यांनी त्यांना चारधाम यात्रा करुन आणले! त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे साधी व सोपी गोष्ट नाही.
लहान बाळा प्रमाणे त्यांना उचलुन घेणे इथपर्यंत!
जीवनसाथी म्हणजे काय? हे त्यांनी स्वतःच्या कृतीतुन सर्वांना पटवुन दिले आहे.
दया,क्षमा,शांती,प्रेम,कृतज्ञता या सर्वांचा मेळ म्हणजे रमेशराव ददगाल अस म्हणायला मुळीच हरकत नाही. ! याचे ते एक उत्तम उदाहरण आहे .
ते अष्टपैलू कलाकार आहेत. प्रत्येक क्षेत्रात ते कार्य करतात व त्यांच्या कार्याला यश लाभते हे विशेष !
त्यांनी आजपर्यंत अनेक देशांना भेटी दिल्या .तेथील संस्कृती त्यांनी जवळून बघितली. भूतान,नेपाळ, दुबई ,सिंगापूर, मलेशिया ,थायलंड अंदमान निकोबार अश्या अनेक देशात त्यांचा प्रवास झाला. तेथील त्यांनी माहिती जाणून घेतली त्याप्रमाणे ते आपले सामाजिक कार्य करीत असतात.एव्हढेच नाही तर ते अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत.
त्या सर्व संस्थेचे काम ते खूप आनंदाने व प्रामाणिकपणे पार पाडतात.
ददगालजी हे योगात निपुण व हुशार आहेत.त्यानी अनेक शिबीरे घेऊन नागरिकांचे आरोग्य दुरुस्त केले. आजही त्यांची समाज सेवा अविरतपणे सुरू आहे.
ते गायक पण आहेत. त्यांनी 2019 पासून आतापर्यंत 2038 गाने गायिले. त्यांचे 450 गाने यू ट्यूबवर प्रसारित झाले आहेत. तर फेसबुकवर तब्बल 350 गाने आहेत.
ददगालजी नाट्य कलावंत देखील आहेत. त्यांनी बदाम राणी, चौकट गुलाम, दंगल, होय आम्ही बौद्ध आहोत, व थांब टकल्या भांग काढतो अश्या अनेक नाट्यप्रयोगात त्यांनी आपल्या उत्तम भूमिका साकारल्या व रसिकांची दाद मिळवली .असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आमच्या डॅा. सखाराम कुचीनकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक बहुउद्देशीय संस्थेला सचिव म्हणून मिळाले.
हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
शेवटी मी स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॅा .सखाराम कुचीनकर बहूउद्देशीय संस्थेची अध्यक्षा व महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपची एक मुख्य मार्गदर्शिका म्हणून पुन्हा एकदा ददगालजी यांना नुकत्याच पार पडलेल्या 75 व्या वाढदिवसाच्या व सुवर्णं महोत्सवी सोहळ्याला मनःपूर्वक शुभेच्छा देते. तद्वतच त्यांचे अभिनंदन करून या पुढेही त्यांचा जीवन प्रवास असाच आनंददायी,सुखद,व भरभराटीचा जावो हिच ईश्वरास प्रार्थना करते व येथेच माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते. मायाताई कोसरे सहज सुचलं
मुख्य मार्गदर्शिका नागपूर