Home Breaking News शेतकरी संघटनेचे नेते भाजपात भव्य पक्ष प्रवेश8 कि

शेतकरी संघटनेचे नेते भाजपात भव्य पक्ष प्रवेश8 कि

57

शेतकरी संघटनेचे नेते भाजपात भव्य पक्ष प्रवेश

सुवर्ण भारत : रविकुमार बंडीवार

प्रतिनिधी, कोरपना

गडचांदूर‌ : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, समाजसेवक व सरपंच   अरुण रागीट तसेच कवठाला (ता. कोरपण )येथील सरपंच सौ. रुपाली बोबडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीत जाहीरपणे भव्य प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश आमदार  देवराव   भोगळे यांच्या प्रभावी नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून व भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर निष्ठा व्यक्त करत करण्यात आला.
या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव व विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
• भाजप हा खर्‍या अर्थाने शेतकरी, कामगार व सामान्य जनतेचा पक्ष आहे.
• विकास आणि पारदर्शक कारभार हेच पक्षाचे ध्येय असून शेतकऱ्यांचा सन्मान व हक्काची हमी हीच पक्षाची ओळख आहे.
• स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अरुण रागीट व सौ. रुपाली बोबडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर, विकासात्मक दृष्टिकोनावर आणि मा. आमदार देवराव दादा भोगळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षात दाखल झाले आहेत. यापुढेही ग्रामविकास, शेतकरी कल्याण आणि तरुणांच्या प्रगतीसाठी ते अविरतपणे काम करत राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्ष प्रवेशामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढल्याचे सर्वत्र जाणवून आले.