• पोलिस बाॅईज असोसिएशनचा पुरस्कार समारंभ थाटात संपन्न!
• अनेकांना पुरस्कार देऊन केले सन्मानित!
सुवर्ण भारत: किरण घाटे
कोल्हापूर : पोलिस बॉईज असोसिएशनचा 12 वा वर्धापन दिन इचलकरंजी { कोल्हापूर } येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक { Ad .sp } अण्णा साहेब जाधव , इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, शहापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी,हातकणंगले पोलीस स्टेशनचे शरद मेमाणे,शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे,जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके , पोलिस उपनिरीक्षक विक्रांत गायकवाड , हिरकणी न्यूजचे डॉ.गणेश वाईकर ,अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाच्या डाॅ.मनिषा पुणेकर या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला राज्यातील पोलिस बाॅईज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.
अशी माहिती जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी दिली.
