गडबोरी वासेरा येथे उमा नदी पुलाला अनोळखी व्यक्तीचे प्रेत अडकले
सुवर्ण भारत: रोशन खानकुरे, प्रतिनीधी,चंद्रपूर
सिंदेवाही : सिंदेवाही आज दिनांक २८ ऑगस्ट गडबोरी वासेरा परिसरातील उमा नदीच्या पुलावर आज सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत अडकलेले अवस्थेत दिसून आले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
चिमूर परिसरातून वाहत येणारी उमा नदी, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहे. त्यातच एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहत येऊन पुलाखाली अडकला असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीने निळ्या रंगाचा शर्ट व कड्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तरी कोणी हरवले असल्यास त्वरित सिंदेवाही पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी केले आहे.
या तपासाचे काम पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बावणे, ए.एस.आय. सोनवणे व त्यांचा पथक करीत आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास सुरू आहे.
