• लाॅयड्स मेटल्स उद्योग परिसरातील
नवीन प्रकल्पात गणरायाचे आगमन!
• यंदाचे प्रथम वर्ष
सुवर्ण भारत :पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घूस येथील लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीतील नवीन प्रकल्पाच्या निवासस्थानी गणरायाचे यंदा प्रथमच मंगल आगमन झाले. या प्रकल्पाचे कामगार व कर्मचाऱी हे या पुढेही ही परंपरा कायम ठेवणार असून हा गणेशोत्सव या वेळी ते थाटात ,उत्साहात,व आनंदात साजरा करणार आहे.
काल सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कामगार व कर्मचारी यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधीनुसार पुजा- अर्चना केली.
श्री गणेशाच्या मंगलमय आगमनाने उद्योगात आनंद,उत्साह व सकारात्मक उर्जा नांदु दे! अशी प्रार्थना या वेळी सर्वांनी गणराया कडे केली.
