31ऑगस्ट रविवार ला मुक्ती दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, मार्गदर्शन व आरोग्य शिबीर
कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र, जिल्हा चंद्रपूर तथा
इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण, सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर तर्फे आयोजित, 31ऑगस्ट मुक्ती दिवस शासन स्तरावर विविध सामाजिक संघटनांच्या सहयोगाने सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व विविध योजनांचे माहितीपर मार्गदर्शन व आरोग्य शिबीर आयोजन करून विमुक्त जाती, भटक्या जमाती चां इतिहास, राष्ट्र उभारणीसाठी असलेले भरीव योगदानाप्रति स्मृतींना उजाळा देऊन सदर समाजाचे देशासाठी चे महत्त्वाचे योगदान व संस्कृती नवीन पिढीला अवगत करून देणे. व सदर समाज सर्वांगीण दृष्ट्या राज्य व राष्ट्रीय विकासाचे प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करण्याचे उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने 31ऑगस्ट हा मुक्ती दिवस शासनस्तरावर साजरा करण्याचे आदेश काढले. त्यानुसार अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश शाखा व जिल्हा शाखा चंद्रपूर तसेच समाज कल्याण विभाग, ईतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर चे संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जलनगर वार्ड चंद्रपूर येथे दिनांक 31ऑगस्ट 2025 रोज रविवार ला सकाळी 11.00 वाजता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मार्गदर्शन व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र. प्रमुख मार्गदर्शक सुधाकरराव अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग,कार्यक्रमाचे अध्यक्ष मान आनंदराव वाय. वाय. अंगलवार महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली.
विशेष मार्गदर्शक मान. डॉ्. नरसिंम्हाराव गुंजी, समन्वयक दक्षिण भारत डी.एन. टी समाज हैद्राबाद, मान. श्री. विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग चंद्रपूर. मान श्री सचिन मडावी सहाय्यक संचालक ईतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर, मान. श्री रोहन कांबळे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर
तसेच चंद्रपूर जिल्हा, विदर्भ महाराष्ट्र स्तरातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विवध संघटनाचे अध्यक्ष व अनुभवी प्रमुख मार्गदर्शक मान्यवर सर्वश्री कृष्णाजी नागपुरे, प्रभाताई चिलके, चंद्रशेखर कोटेवार, डॉ .योगेश दुधपाचारे, डॉ. राजू ताटेवार, दिवाकर बावणे, संतोष लहामगे, अनिल बोरगमवार, दिवाकर पुद्दटवार, डॉ.सुधाकर कामतकर, संतोष गर्गेलवार, प्रा. विश्वनाथ राठोड , विठल कुसळे, बाळू पवार, उद्दव पुरी,डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. मनोज कुपरणे, किसन कलीवाले, रमेश गदईकर, सोमेश्वर पडगेलवार, महारष्ट्र संघटन प्रमुख,अशोक पडगेलवार, अँड.मनोज पारशिवे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,अशोक जाधव,रतन शिलावार, रंजनाताई पारशिवे, किरण नागपुरे, नीता नवरखेले चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष इत्यादींचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे तेंव्हा बहुसंख्येने समाज बंधू भगिनी व युवकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे लाभ घ्यावे असे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर चे अधिकारी व सचिन चलकलवार जिल्हा सचिव एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.
जास्ती त जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आनंदराव अगलवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती यांनी केले


