Home Breaking News ▪️मांदाडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ▪️वर्षा मांदाडे यांचे अपघाती निधन !

▪️मांदाडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ▪️वर्षा मांदाडे यांचे अपघाती निधन !

643
Oplus_16777216

▪️मांदाडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

▪️वर्षा मांदाडे यांचे अपघाती निधन !

चंद्रपूर -किरण घाटे
प्रियंका गायकवाड
एकीकडे भक्तगण व भाविक जिल्हाभर गणेश उत्सव भक्तीभावाने व श्रद्धेने साजरा करत असतानाच काल राजूरा- गडचांदूर मार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात सहा जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
याच भीषण अपघातात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या एक सदस्या ऐश्वर्या मांदाडे यांच्या काकू वर्षा मांदाडे ह्या मूत्यूमुखी पडल्या.
माकोना या गावावरुन त्या बचत गटाचे तीस हजार रुपये बॅंकेत जमा करण्यासाठी राजूरा येथे आल्या होत्या.
दिवंगत वर्षा मांदाडे यांना दोन मुले असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे .त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असत .दरम्यान या भीषण अपघातात मूत्यूमुखी पडलेल्या त्या सहा जणांच्या परिवारातील परिस्थितीही नाजूक व हलाखीची आहे.
शासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता सर्वत्र होवू लागली आहे.
महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवाराच्या वतीने त्या घटनेतील दिवंगत वर्षा मांदाडे ,रविन्द्र बोबडे, शंकर पिपरे, तनू पिंपळकर, औंकारीबाई पुप्पलवार व प्रकाश मेश्राम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
सदरहु अपघाताची घटना समाजमन सुन्न करणारी असल्याचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, शैला चिमड्यालवार, साधना धकाते, रजनी रणदिवे,अधिवक्ता अंजली गुंडावार,संजीवनी धांडे , रंज्जू मोडक,व नलिनी आडपवार यांनी म्हटले आहे.