• रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बहुजन समाज पार्टीचे बामणी ग्राम पंचायतला निवेदन
सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
बल्लारपूर: बहुजन समाज पार्टीच्या वतीने बामणी येथील रस्त्याच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आज एक लेखी निवेदन ग्राम पंचायतला सादर करण्यात आले.
श्री राम चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत पूर्णपणे खराब झालेला रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी हे निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायतीचे सरपंच प्रहलाद आलम यांनी हे निवेदन स्वीकारीत लवकरात लवकर समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर करताना विधानसभा अध्यक्ष किसन केसकर, बी.व्ही.एफ. शिवविलास वर्मा,ओम प्रकाश दारुंडे, बाळू मेश्राम, आदिं उपस्थित होते.


