Home Breaking News शहर काँग्रेस कमिटीने रुग्णांना फळे वाटून केला हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस साजरा...

शहर काँग्रेस कमिटीने रुग्णांना फळे वाटून केला हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस साजरा !

146

शहर काँग्रेस कमिटीने रुग्णांना फळे वाटून केला हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस साजरा !

सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

बल्लारपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस आज रविवारी उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, सेवादल प्रमुख प्राणेश अमराज, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चेतन गेडाम, छोटू सिद्दीकी,संदीप नक्शीने, डॉ युवराज भसारकर, विनोद आत्राम , रवि वेले,अनिल मारशेट्टीवार ,प्रफुल बोप्पनवार, बाला बारसागड़े, श्लोक तिवारी, श्रीतिज सहारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.