#Varora
• रोटरी क्लब च्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : येथील रोटरी क्लबच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना रोटरी क्लब तर्फे स्मार्टफोन प्रथम पारितोषिक, इनरव्हील क्लबच्या वतीने टावर स्पीकर द्वितीय, तर रोटर क्लब तर्फे मिक्सर हे तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे. या सोबतच अन्य आकर्षक प्रोत्साहन पर बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छणाऱ्या व्यक्तींनी दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत घरच्या गणपतीसोबत कुटुंबाचा एक फोटो, सजावटीचा एक व्हिडिओ, पूर्ण नाव आणि पत्ता नमूद करून रोटी क्लबच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करावा किंवा रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांच्या ९८६०4६४८०१ या मोबाईल क्रमांकावर पाठवावा असे आवाहन रोटरी क्लब तर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रोटरी दांडिया उत्सवामध्ये बक्षीस वितरित करून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, सचिव राहुल पावडे ,कोषाध्यक्ष देवानंद गावंडे ,तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता डोंगरवार, सचिव संध्या बाराई, आणि रोटट्रॅक क्लबचे अध्यक्ष पूर्वेश मनोत, सचिव विकी आगलावे तसेच यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.



