• ज्ञान साधना बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने
वणीत होतोय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार!
• विदर्भस्तरीय काव्य संमेलन व शिक्षकरत्न पुरस्कारांचेही आयोजन
सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
चंद्रपूर – ज्ञान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळाच्या वतीने येत्या 5
सप्टेंबरला शिक्षकदिनी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होत आहे.यात प्रामुख्याने राजूराच्या जेष्ठ साहित्यिक तथा आदर्श शिक्षिका अधिवक्ता मेघा धोटे, सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, योगशिक्षिका तथा कवयित्री वैजयंती गहुकर, चंद्रपूरच्या समाजसेविका तथा सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व
वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या लोकप्रिय सुवर्ण भारत न्यूज. चॅनलच्या चंद्रपूर शहर प्रतिनिधी कु.प्रियंका गायकवाड यांचा समावेश आहे .
हा सत्कार सोहळा वणी येथील वसंत जिनिंग हाॅल येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित केला असून याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानसाधना कविता संग्रहाचे प्रकाशन ,पहिले काव्य संमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा,व राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार समारंभ होत असल्याची माहिती आयोजक अधिवक्ता संतोष भादिकर, श्रीमती रजनी प्रल्हाद पोयाम व राजेंद्र भादिकर यांनी आज या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहज सुचलं महिलांचा व्हाॅट्सअप गृप सुरु असून या आधी या देखील या गृपवरील अनेक कर्तृत्ववान महिला व तरुणी आपल्या उल्लेखनीय व अतुलनीय कामगिरीसाठी पुरस्कृत झाल्या आहेत.विशेष म्हणजे मूल नगरीच्या पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने गत वर्षी पार पडलेल्या एका भव्य पुरस्कार समारंभात सहज सुचलंच्या तब्बल तेरा कर्तृत्ववान महिलांना सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.



