Home Breaking News • बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीचे भव्य धरणे आंदोलन • लोकशाही विरोधी...

• बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीचे भव्य धरणे आंदोलन • लोकशाही विरोधी कायदा रद्द करण्याची केली मागणी!

62

• बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीचे भव्य धरणे आंदोलन

• लोकशाही विरोधी कायदा रद्द करण्याची केली मागणी!

सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

महाराष्ट्र राज्य सरकार जनसुरक्षा कायद्याद्वारे लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटत आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा अंमलात आणण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान जनविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी मंगळवारी धरणे आंदोलनातून केली .
एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.
बल्लारपूर येथील नगरपालिकेच्या समोर हे धरणे आंदोलन केले
महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी आहे.दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. धरणे आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याचा प्रखर विरोध करण्यात आला. घोषणाबाजी करून महायुतीच्या सरकारच्या जनविरोधी धोरणाचा या वेळी निषेध करण्यात आला.
या प्रसंगी जिला कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, रोशनलाल बिट्टू,शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य,शिवसेना ( उबाठा ) चे उपजिल्हा प्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष बादल उराडे, बल्लारपूर तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, कांग्रेसच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे,माजी अध्यक्ष अब्दुल करीम,माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे,छाया मडावी, सुनंदा आत्राम,भास्कर माकोडे,इस्माईल ढाकवाला,
अफसाना सय्यद,ॲड.मेघा भाले, डॉ. सुनील कुलदीवार, बल्लारपुर विकास आघाड़ीचे भारत थूलकर, युवक कोंग्रेस प्रदेश महासचिव चेतन गेडाम, एन .एस .यू .आय .जिला अध्यक्ष शफाक शेख, ॲड.पवन मेश्राम,प्रकाश पाठक,बाबा साहू,कल्पना गोरघाटे,ज्योती गहलोत,मिनाक्षी गलगट प्रामुख्याने उपस्थित होते.धरणे आंदोलन यशस्वी करण्याकरीता प्राणेश अमराज,नरसिंह रेब्बावार,
राकेश मुलचंदानी, सादिक जवेरी,रोजिदा ताजूद्दीन, नरेश आनंद, अरबाज सिद्धीकी,अंकीत निवलकर, एड. सय्यद,मंगेश बावणे, कासिम शेख,नाना बुंदेल, मेहमूद पठान,नाजुका आलाम,वासदेव येरगुडे,प्रितम पाटील,सुरेश बोप्पनवार,वर्षा कडू, अंकू बाई भूक्या रेखा रामटेके, छाया शेंडे, विथा बाई बावने,शारदा आक्केवर, आकाशकांत दुर्गे,दुर्गेश मुत्यालवार,रक्षित कृष्णापेल्ली,ताहेर हुसेन, मोहसिन शराफत हुसैन, वाजिद खान, कृष्णा देशवाणी, रोनित गलगट, संदीप टांगें, लखपति घुग़लोत, राजू मारमवार, रमेश जक्कू, नंदू पाल, अमीर शेख, चंचल मुन, दुर्गाराज आरेकर, चंदू वाढ़ई, प्रफुल बोप्पनवार, शेख यूसुफ, सुधाकर पोपले, धर्मा बानोत, अंजलि सोमबंसी, सुनीता राजूरकर, पूजा मडावी, आनंद हनमंतु, बॉबी कादासी, मुकद्दर सय्यद, फारुख खान, जहिर अहमद, सादीक , सूर्यकांत साल्वे खान यांच्यासह शेकडो महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता.