अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावले आ. सुधीर मुनगंटीवार – माणुसकीची जिवंत मिसाल
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा,प्रतिनीधी
भद्रावती : नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी जात अ
सताना भद्रावतीजवळ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ताफ्याजवळ एक दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत दिसली. अज्ञात चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने प्रदीप डोके (रा. बल्लारपूर) आणि घनश्याम मेश्राम (रा. विसापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले होते.
घटनास्थळावरून जात असताना आ. मुनगंटीवार यांनी ताफा तात्काळ थांबवून स्वतः पुढाकार घेत जखमींना मदत केली. त्यांनी प्राथमिक उपचाराची व्यवस्था करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या या तात्काळ निर्णयामुळे दोघांनाही वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आणि महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.
सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राजकीय क्षेत्रात जितके सक्रिय आहेत, तितकेच सामाजिक कामांमध्येही पुढे असतात. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, आणि गरजूंसाठी मदतीचे हात देणं – हे त्यांच्या कार्याचे कायमस्वरूपी अंग राहिले आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वाचा त्यांनी पुन्हा एकदा प्रत्यय दिला.
या घटनेतून त्यांच्या संवेदनशील आणि जागरूक नेतृत्वाचे दर्शन घडले असून, त्यांच्या तत्परतेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

