Home Breaking News भाजप बल्लारपूर शहर नियोजन बैठकीत उत्साहवर्धक सहभाग; आगामी कार्यक्रमांसाठी ठोस योजना

भाजप बल्लारपूर शहर नियोजन बैठकीत उत्साहवर्धक सहभाग; आगामी कार्यक्रमांसाठी ठोस योजना

186

भाजप बल्लारपूर शहर नियोजन बैठकीत उत्साहवर्धक सहभाग; आगामी कार्यक्रमांसाठी ठोस योजना

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)


बल्लारपूर : भाजपा बल्लारपूर शहराच्या पुढील काळातील राजकीय आणि सामाजिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालयात भव्य नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री व विदर्भातील ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण दिसून आले.

शहर कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर आयोजित या पहिल्याच बैठकीत शहराध्यक्ष अँड. रणंजय सिंह यांनी आमदार सुधिर मुनगंटीवार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले. महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी व त्यांच्या टीमने, तसेच युवा मोर्चा शहराध्यक्ष मिथलेश खेंगर व कार्यकर्त्यांनी देखील आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

या नियोजन बैठकीस भाजपा जिलाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, विधानसभा संघटन प्रभारी राम लखिया, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, माजी अध्यक्ष काशिनाथ सिंह, रेणुका दुधे, मंडळ महामंत्री मनीष पांडेय, देवा वाटेकर, सतीश कनकम, घनश्याम बुरडकर, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष मिथलेश खेगर, दलित मोर्चा शहराध्यक्ष महेंद्र ढोके, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अमोल झाडे, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष आकाश सिडाम, तसेच अल्पसंख्यांक मोर्चा, सर्व माजी नगरसेवक आणि शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत आगामी काळात बल्लारपूर शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि सर्व मोर्च्यांमधील समन्वय यावर भर देण्यात आला.

बैठकीचा मुख्य उद्देश शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून “सबका साथ, सबका विकास” या संकल्पनेला चालना देणे हा होता, असे भाजपा शहराध्यक्ष रणंजय सिंह यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील प्रत्येक कार्यक्रम अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.