Home Breaking News घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्म एकतेचे दर्शन; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 2.20 लाखांची मदत

घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्म एकतेचे दर्शन; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 2.20 लाखांची मदत

324

घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्म एकतेचे दर्शन; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 2.20 लाखांची मदत

सुवर्ण भारत :पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : पंजाब राज्यात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा संकटाच्या काळात घुग्घुस येथील मुस्लिम बांधवांनी एक सामाजिक आणि मानवीतेचा आदर्श निर्माण करत पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ₹2,20,786/- इतक्या मदतीचा निधी उभारून दिलेला आहे.

ही रक्कम गुरुद्वारा सिंह सभाचे अध्यक्ष संमत सिंग दारीं यांच्या उपस्थितीत जमा करण्यात आली. हा निधी पूरग्रस्तांना मदत म्हणून योग्य माध्यमातून पोहोचवला जाणार आहे.

या उपक्रमात घुग्घुस येथील अनेक मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला असून, विशेषतः आजम खान, मोमीन शेख, अनिस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीक़ी, अज़हर शेख, सानू सिद्दीकी, मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख, फैझान खान आणि इतर मुस्लिम समाजबांधवांनी सहभाग नोंदवला.

हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता, सर्वधर्म स्नेह आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे. धर्म, जात, भाषा या पलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीचा हात पुढे करणे हीच खरी मानवता असल्याचे या कार्यातून अधोरेखित होते.

स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, घुग्घुस शहराच्या सामाजिक सौहार्दाचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.