Home Breaking News • मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीला त्वरित अटक करा- या प्रमुख...

• मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीला त्वरित अटक करा- या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरात भर पावसात धरणे आंदोलन! • जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केले निवेदन सादर

135

• मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीला त्वरित अटक करा- या प्रमुख मागणीसाठी
चंद्रपूरात भर पावसात धरणे आंदोलन!

• जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केले निवेदन सादर

चंद्रपूर- किरण घाटे –

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील बेंबायेथील एका दहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करणाच्या प्रयत्न करणा-या आरोपीला तातडीने अटक करा या प्रमुख मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवारी पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)च्या वतीने एक दिवशीय धरणे आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे भर पावसात मंडप विना उपरोक्त पार्टीने हे धरणे आंदोलन केले.
बेंबाळ या गावी दि.29/6/2025 ला आरोपी निशीगंध उर्फ चिंटू जपान उराडे ह्याने एका दहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.पिडिताच्या आईने या बाबतीत संबंधित पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली.
त्यानंतर पी.पी.आय.डी.जिल्हा चंद्रपूर तर्फे दि.6/8/2025 व दि.19/82025 ला चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन सादर केले.
या शिवाय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील निवेदन सादर करण्यात आले.
परंतु ख-या अर्थाने या प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे आज पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने चंद्रपूरात धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपरोक्त पार्टीच्या जिल्हाध्यक्ष महिलाविंग नभा वाघमारे, महेन्द्र खंडाळे व मिलिंद खोब्रागडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आज दुपारी एका शिष्टमंडळाने याच गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी व पिडितास योग्य न्याय मिळण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले.या वेळी नभा वाघमारे व पार्टीचे अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.