Home Breaking News दुःख माझे सांगू कुणाला?

दुःख माझे सांगू कुणाला?

176

दुःख माझे सांगू कुणाला?

माझे दुःख मी आता
सांगू तरी कुणा कुणा
आई बाबा विना जन्म
माझा वाटे सुना सुना //१//

तुम्ही सोडून गेलात
जीव झाला कासावीस
तुमच्या आठवणींनी
रडे मी रात्रदिस /२//

दुःख मी सांगू कुणा
तुझ्या विरहाचे माऊली
तुझ्या प्रेमळ स्पर्शाची
नाही शिरावर सावली //३//

दुःख मी सांगू कुणा
कळत नाही मजला
दुःखाचा ही येथे
लोकांनी बाजार मांडला //४//

तुमच्या सारखी काळजी
आता कोणी करत नाही
तुमच्या आठवणी शिवाय
जीवनी आता काही नाही //५//

🔴कु.मंगल शामराव मिसाळ
सहज सुचलं सदस्य ठाणे