Home Breaking News एस.एम.जी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

एस.एम.जी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

203

एस.एम.जी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस
साजरा

चंद्रपूर – किरण घाटे

हिंदी दिवसाचे महत्त्व लक्षात घेता ओम साई शिक्षण संस्था संचलित एस.एम.जी विद्यामंदिर दिवा येथे शनिवार दि.13 सप्टेंबर 2025 रोजी हिंदी दिवस मोठया थाटात-माटात पार पडला.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्यध्यापिका सानिका सरपोळे व
उपमुख्यध्यापिका सरोज बिरारी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
हिंदी विषयाचे जेष्ठ शिक्षक संदिप वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी मंडळाची स्थापना करण्यात आली.तसेच हिंदी दिवसाचे महत्व यावर त्यांनी या वेळी आपले विचार मांडले
हिंदी दिवसाच्या निमित्ताने कथाकथन, वैयक्तिक गीतगायन, अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.कवयित्री मंगल मिसाळ व सांस्कृतिक विभाग प्रमुख आरुषी शिगवण यांनी परिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. शेवटी
शितल कदम यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.