हैदराबाद स्टेट गॅझेटिअरनुसार बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करा” — हितेश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सुवर्ण भारत: मनोज गोरे
प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : हैदराबाद स्टेट गॅझेटिअरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये स्पष्टपणे उल्लेख असूनही अद्याप या समाजाला त्या अनुषंगाने आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने, त्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्ह्याचे भटके विमुक्त जमातीचे अध्यक्ष हितेश चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात चव्हाण यांनी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवांना अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी ऐतिहासिक व प्रशासकीय कागदपत्रांचा आधार देत बंजारा समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे.
“हैदराबाद स्टेट गॅझेटिअर हे ऐतिहासिक दस्तऐवज असून, त्यात बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, आजतागायत या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक बाब आहे,” असे चव्हाण यांनी सांगितले.
त्यांनी असेही नमूद केले की, आरक्षणाअभावी बंजारा समाज शैक्षणिक व सामाजिक प्रगतीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा व त्यांना घटनात्मक हक्कांचे संरक्षण मिळावे.
या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लवकरच अधिकृत पाठपुरावा करण्याचाही इशारा

