Home Breaking News विद्युत प्रवाह लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू! मूल तालुक्यातील घटना: गावात पसरली शोककळा

विद्युत प्रवाह लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू! मूल तालुक्यातील घटना: गावात पसरली शोककळा

61

विद्युत प्रवाह लागल्याने दोन कामगारांचा मृत्यू!
मूल तालुक्यातील घटना: गावात पसरली शोककळा

चंद्रपूर- किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जुनासूर्ला या गावात आज सकाळी दोन कामगारांना हायटेंशन विद्युत वाहिनीचा प्रवाह लागल्याने घटनास्थळीच मूत्यू झाल्याची दूदैवी घटना घडली.या घटनेतील हे दोन्ही कामगार नवेगाव भूजला येथील रहिवाशी असल्याचे समजते.
घटनेचे वृत्त कळताच अनेकांनी घटनासथळी धाव घेतली.
मृत्यू पावलेल्या कामगारांचे नांव अनुक्रमे हरीदास चूधरी व विनोद बोरकुटे असल्याचे चौकशी अंती कळले.
मजूरी करण्यासाठी ते जुणासुर्ला येथे एका घराच्या बांधकामासाठी आले होते.
या घटनेमुळे नवेगाव भूजला या गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान उपरोक्त घटनेची मूल पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे.