Home Breaking News • सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज; आ. किशोर जोरगेवारांची घटनास्थळी भेट...

• सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज; आ. किशोर जोरगेवारांची घटनास्थळी भेट • रहमत नगर येथील परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याची गरज नाही !

58

• सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज; आ. किशोर जोरगेवारांची घटनास्थळी भेट

• रहमत नगर येथील परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याची गरज नाही !

चंद्रपूर – किरण घाटे

चंद्रपूर शहरातील
रहमत नगर येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. याची माहिती मिळताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह प्लांटची पाहणी केली. आमदार जोरगेवार यांच्या सूचनेनंतर सदरहु लिकेज बंद करण्यात आले असून सावधगिरी म्हणून येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपाच्या प्रभारी आयुक्त आयुक्त वर्षा गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामटेके उपस्थित होते.
रहमत नगर येथे चंद्रपूर महानगरपालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. सदरहु प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना आज (बुधवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना उलटी व श्वसनाचा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच आमदार जोरगेवार यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी तातडीने गळती बंद करण्यात आली असून जवळपासच्या नागरिकांना किदवई हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.