Home Breaking News मोरवा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

मोरवा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

49

चंद्रपूर- किरण घाटे 

चंद्रपूर समिपच्या मोरवा ग्रामपंचायत येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या थाटात व उत्साहात करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी विभूषित केले होते. सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या हस्ते आकाशात बलून्स सोडून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा ,व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिहं उपस्थित होते.

या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा व दर्जेदार व्यवस्था उपलब्ध करून देणे हा असून या निमित्ताने ग्रामविकासाची दिशा अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला मोरवा गावच्या सरपंच स्नेहा साव , उपसरपंच महादेव पिदुरकर व ग्राम पंचायतचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.