कोरपना येथे पोलिस बाॅईज असोसिएशनची नविन शाखा निर्माण !
चंद्रपूर किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तहसिल अंतर्गत येत असलेल्या कढोली खू.येथे नुकतीच पोलिस बाॅईज असोसिएशनची नविन शाखा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत या नविन शाखेची कार्यकारणी घोषीत करण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने कोरपना तालुक्याचे अध्यक्ष म्हणून अतुल टोंगे तर उपाध्यक्षपदी ज्ञानदीप वडस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिवाय उपरोक्त कार्यकारिणीत अन्य पदाधिकाऱ्यांचा व सदस्यगणांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्याचे पोलिस बाॅईज असोसिएशनचे संस्थापक- अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार उपरोक्त कार्यकारिणी तयार करण्यात आली असल्याचे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निमगडे यांनी सांगितले.
पार पडलेल्या बैठकीला चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

