Home Breaking News #Ballarpur • बल्लारपूर येथे बथुकम्मा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार :...

#Ballarpur • बल्लारपूर येथे बथुकम्मा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार : 2000 हून अधिक महिलांचा सहभाग अपेक्षित

119

#Ballarpur

• बल्लारपूर येथे बथुकम्मा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार : 2000 हून अधिक महिलांचा सहभाग अपेक्षित

सुवर्ण भारत: पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात तेलंगणातील समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा प्रतीक असलेला बथुकम्मा उत्सव यंदा अधिक भव्य आणि व्यापक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या आयोजना संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन भाजप बल्लारपूर शहर मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

या बैठकीला माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन लाभले. माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य चंदनसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. त्याचप्रमाणे, भाजप बल्लारपूर शहराध्यक्ष रणंजय सिंह आणि महामंत्री सतीश कनकम यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत निर्णय घेण्यात आला की बथुकम्मा उत्सव दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी बल्लारपूर येथील शगुन लॉन समोरील मैदानात पार पडणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण बल्लारपूर शहरातून सुमारे 2000 महिला सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करून तेलुगू संस्कृतीचा गौरव वाढवण्याचा उद्देश असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा, फुलांनी सजवलेली बथुकम्मा आरास, पारंपरिक नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून महिलांचा सांस्कृतिक सहभाग दिसून येणार आहे. संपूर्ण बल्लारपूरकर नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बैठकीस प्रमुख मान्यवरांची उपस्थिती :
या बैठकीस अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये
माजी नगरसेवेक येल्लाय्या दासराफ,स्वामी रायबरम, शंकर तोकल, धर्मराज तगरम, रवि अडपु,श्रीनिवास कंदुकुरी, हरिबाबू लंका, रोहन तोकल, वेंकटेश येलगमवार, श्रीनिवास उष्कलवार,अक्षय बोम्मावार, कृष्णा नागिल्ला, सतीश बोंकुरी, महेंद्र ढोके, अरुण वाघमारे, मिथलेश खेंगर, अज़हर शेख
याशिवाय, इतर अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, महिला सहभाग, आणि पारंपरिक कार्यक्रमांची आखणी यावर सविस्तर चर्चा करून समिती गठित करण्यात आली आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था व महिला मंडळांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

बथुकम्मा हा केवळ एक उत्सव नसून, तो नारीशक्तीचा, निसर्गप्रेमाचा आणि पारंपरिक संस्कृतीचा एक सुरेख संगम आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक सोहळा न राहता, एक सामुदायिक एकतेचे प्रतीक ठरणार आहे.