बातमी प्रसिद्ध होताच वाहतूक पोलीस अधिकारीला आली जाग !
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घुसचे अध्यक्ष व संघटक ने केली बातमी प्रकाशित
सुवर्ण भारत :पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस येथील ट्राफिक सिंग्नल बंद असल्यामुळे व वाहतूक पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहत नसल्याने कारखान्यात काम करणाऱ्या काही कामगार व कर्मचारी तसेच नागरिक यांचे या रस्त्यावर अपघात झाले होते यामुळे बातमी प्रकाशित होताच तीन दिवसात ट्राफिक सिंग्नल चालु झाले.
अपघाताला जिम्मेदार कोण?
वणी -चंद्रपूर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहन पार्किंग ची व्यवस्था नाही तसेच
या ठिकाणी ट्राफिक सिग्नल असून
ही ट्राफिक कर्मचारी राहत नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने लावतात. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश खडसे यांनी पेपरला छायाकिंत फोटो सह बातमी प्रकाशित केली होती तसेच संघटक पंकज रामटेके यांनी अपघात होताच प्रशासनाला आली जाग, या बातमीची ठाणेदार प्रकाश राऊत यांनी दखल घेऊन तीन दिवसाने ट्राफिक सिंग्नल जवळ वाहतूक पोलीस अधिकारी,होमगार्डची नियुक्ती केली असून.रस्त्यावरील एका बाजुला एक आफिस बनवुन तेथुन लाऊड स्पिकरच्या माध्यमातुन अलाऊन्स करण्यात येते की,ट्राफिक सिंग्नलचे पालन करा, वाहने रस्त्यावर उभे करू नका,नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, वाहने सुखरूपाने चांगले चालवा, नियमाचे पालन करा.
नियमाचे उलघणं केल्यास दंड होणार, असे वारंवार माईक द्वारे अलाऊन्स करण्यात येत आहे. आपले शहरात अपघात होणार नाही याची दक्ष्यता बाळगा. असे सांगितले जाते. या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

