• रोजगार मेळाव्यातून १३२ बेरोजगारांना मिळाला रोजगार
• गडचांदूरमध्ये महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सुवर्ण भारत | प्रतिनिधी – मनोज गोरे, चंद्रपूर
कोरपना : तालुक्यातील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला युवक-युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात ४१६ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला, तर १३२ उमेदवारांची थेट निवड विविध नामांकित कंपन्यांमध्ये करण्यात आली. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.
या कंपन्यांनी दिला सहभाग:
ओमेंट वेस्ट प्रा. लि., चंद्रपूर – ५७ पदे
साई वर्धा पॉवर लि., वरोरा – १५ पदे
जेपी असोसिएट्स अँड लॅबोरेटरीज, चंद्रपूर – २० पदे
गोपनी अँड आयर्न पॉवर लि. – १० पदे
विदर्भ क्लीक १ सोल्युशन, चंद्रपूर – २०० पदे
वैभव इंटरप्रिन्सेस, नागपूर – ६७० पदे
डिक्सन इंजिनिअरिंग प्रा. लि., नागपूर – २० पदे
एसबीआय लाईफ इन्शुरन्स, चंद्रपूर – १०० पदे
संसार सृष्टी इंडिया प्रा. लि., चंद्रपूर – ५० पदे
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष विकास भोजेकर, संचालक रामचंद्र सोनपितरे आणि संचालक राहुल बोढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड व सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे, तर आभार प्रा. पवन चटारे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम:
प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. अनिस खान, डॉ. शर्मा, डॉ. घोडिले, डॉ. मुन, प्रा. वैद्य यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीत’ आणि सांगता ‘राष्ट्रगीत’ गात करण्यात आली, ज्याने वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली.

