Home Breaking News बोरगाव (खु) आश्रमशाळेत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय जनजाती...

बोरगाव (खु) आश्रमशाळेत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा

164

बोरगाव (खु) आश्रमशाळेत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा

सुवर्ण भारत | प्रतिनिधी : मनोज गोरे, चंद्रपूर

कोरपना : बोरगाव (खु) येथील आश्रमशाळेत आदिवासी क्रांतीचे प्रतीक व स्वातंत्र्यसंग्रामातील महान योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण मडावी, जिल्हाध्यक्ष, भाजपा आदिवासी आघाडी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद कोडापे, कोषाध्यक्ष, भाजपा कोरपना तालुका यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात कोडापे म्हणाले की, “देशाच्या इतिहासात आदिवासी समाजाचे योगदान फार मोठे असून, बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला आहे. ‘जनजाती गौरव दिना’च्या निमित्ताने या महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याची संधी मिळत आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमात तिरुपती कन्नाके (महामंत्री, भाजपा जमाती मोर्चा, कोरपना), सागर धुर्वे (सोशल मीडिया प्रमुख), पत्रकार मनोज गोरे, तसेच मुख्याध्यापक भगत, प्राथमिक मुख्याध्यापक ताजने, ठाकरे, कोट्टी, वाढई, आडते, गारघते, झाडे मॅडम, मडावी मॅडम, जया धारणकर, मत्ते, उद्धव राजूरकर, हनुमंत तुमराम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध, रांगोळी, चित्रकला व नृत्य स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक ताजने यांनी केले. संचालन कोट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मत्ते यांनी केले.