Home Breaking News फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये उत्साहात पार पडला

फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये उत्साहात पार पडला

168

फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये उत्साहात पार पडला

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, चंद्रपूर येथे GDA (General Duty Assistant) बॅच लाँचिंग, फ्रेशर्स स्वागत व फेअरवेल सोहळा एकत्रितरीत्या मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. या बहारदार कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणारे सन्मान व उत्साहवर्धक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
या विशेष सोहळ्यास चीफ प्लांट मॅनेजर सत्यनारायण दिघामार्ती, CSR प्रमुख साई गौतम, प्रोजेक्ट ऑफिसर रुपेश कुकडे आणि कु. प्रगती पाल हे मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी कौशल्य विकास आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी अदानी समूहाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौरभ मून व कु. स्वाती फरकाडे यांनी केले, तर संयोजनाची जबाबदारी गणेश कांबळे व कु. प्रतिक्षा मोहितकर यांनी सक्षमपणे पार पाडली.
कार्यक्रमात किट वितरण सोहळा पार पडला आणि CSR विभागातर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर्स देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ही एक गौरवाची आणि प्रेरणादायक क्षण होती.
विशेष आकर्षण ठरलेला फ्रेशर्स रॅम्प वॉक व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सेंटर हेड सौ. शुभांगी नगराळे यांनी फ्रेशर्स 2025 च्या विजेत्यांची घोषणा केली, ज्यात दोन विद्यार्थ्यांनी ‘फ्रेशर्स ऑफ द इयर’ हा मानाचा किताब पटकावला.
विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम एक अविस्मरणीय पर्वणी ठरली. प्रेरणा, उमेद व आत्मविश्वासाने भारलेला हा दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा ठरला.