Home Breaking News #Ghugus • संतोष नूने यांची भाजप युवा मोर्चा, घुग्घुस शहराध्यक्षपदी नियुक्ती ...

#Ghugus • संतोष नूने यांची भाजप युवा मोर्चा, घुग्घुस शहराध्यक्षपदी नियुक्ती • लोकहिताच्या कार्यकर्त्याला मोठा सन्मान

98

#Ghugus
• संतोष नूने यांची भाजप युवा मोर्चा, घुग्घुस शहराध्यक्षपदी नियुक्ती

• लोकहिताच्या कार्यकर्त्याला मोठा सन्मान

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : लोकहितसेवा, सामाजिक कार्य आणि भाजपप्रेम यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले माजी सरपंच संतोष नूने यांची नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चा, घुग्घुस शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना ही जबाबदारी देण्यात आली.

नवीन नगर परिषद स्थापन झाल्यानंतर घुग्घुसमध्ये विकासाचे नवे क्षितिज खुले झाले आहे. अशा वेळी मतदारसंघातील आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक आणि समाजकार्यांत नेहमी अग्रेसर असलेले संतोष नूने यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपवली आहे.

शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या नेत्रदीपक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना युवा नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

या निवडीनंतर आमदार किशोर जोरगेवार, पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि घुग्घुसकर नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.