#Chandrapur
• विजय चंदावार व रमेश ददगाल यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरात नव्या योगा वर्गाचे थाटात उद्घाटन
सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जेष्ठ योग शिक्षक विजय चंदावार व रमेश ददगाल यांच्या प्रमुख उपस्थीतीत आज सोमवारी सकाळी 6 वाजता चंद्रपूर येथील तुळसी नगरात नव्या योगा वर्गाचा थाटात उद्घाटन समारंभ पार पडला.
या वेळी प्रामुख्याने विजय चंदावार, रमेश ददगाल ,अशोक पूर्णये,नंदा बिहाडे, सुनिता पूर्णये,अशोक बिहाडे,लक्ष्मण सोनुले,प्रिती येलीचपूरवार, मिनाक्षी साहू,निता बोरीकर,मोहीनी देवतळे, लता पेंदाम, शालिनी सुरवाडे सुशिला आमटे,शालू सोनेकर ,पूनम सहारे,आदिं उपस्थित होते.
विजय चंदावार व रमेश ददगाल यांनी उपस्थित साधक व
साधीकांना आपल्या मार्गदर्शक भाषणातून योगाचे महत्त्व पटवून दिले.तदवतचं त्यांना योगाचे काही प्रात्यक्षिके करून दाखविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण नंदा बिहाडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार अशोक पूर्णये यांनी मानले.

