Home Breaking News • सावली येथील शासन वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरणात शेतकरी नेते बच्चू...

• सावली येथील शासन वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरणात शेतकरी नेते बच्चू कडु यांच्या कडे गावकऱ्यांचे लेखी निवेदन सादर ! • साखरी गावातील गंभीर प्रकार

191

• सावली येथील शासन वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरणात शेतकरी नेते बच्चू कडु यांच्या कडे गावकऱ्यांचे लेखी निवेदन सादर !

• साखरी गावातील गंभीर प्रकार

सुवर्ण भारत – किरण घाटे : विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील साखरी या गावात वाटप झालेल्या शेतजमीन प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता त्या शेतजमीनींचे खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहे.वास्तविक पाहता शासन वाटप अश्या जमीन विक्री प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.परंतु अशी परवानगी संबंधित प्रकरणात कुठेही दिसून आली नाही .या प्रकरणात आता गावकऱ्यांनी आपला बुलंद आवाज केला असून त्या अनुषंगाने योग्य चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी या पूर्वीच त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आता शेतकरी नेते बच्चू कडु चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या कडे केली आहे.
नुकतीच साखरी गावातील काही मंडळींनी पाथरी या गावात त्यांची एक सभा आयोजित केली असताना त्यांनी उपरोक्त लेखी तक्रार सादर करुन या बाबतीत कसे व्यवहार घडत गेले हे त्यांना कागदपत्रे दाखवून समजावून देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात कुठल्याही अधिका-यांनी लक्ष पुरविले नाही.दरम्यान या बाबतीत समाजसेवक बालाजी बावणे यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार सादर करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या शिवाय मूलचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ यांनी देखील उपरोक्त प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष पूरवून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याच प्रकरणांच्या अनुषंगाने समर्थ हे लवकरच महसूल आयुक्त नागपूर यांची भेट घेणार असल्याचे समजते.