• स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा रविवारी उद्घाटन समारंभ!
• कर्तृत्ववान महिला व
प्रेरणा पुरस्कारांचेही आयोजन!
• माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती!
चंद्रपूर : किरण घाटे
स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय. संस्थेचा उद्घाटन समारंभ मूल तालुक्यातील जानाळा येथे रविवार दि. 28 सप्टेंबरला दुपारी १२वाजता होत आहे.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनूले ,चंद्रपूर विकलांग संस्थेचे संस्थापक श्रीराम पान्हेकर मूल नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे,जानाळा ग्राम पंचायतच्या सरपंच दर्शना किन्नाके , व चिरोलीचे पटवारी सचिन रणदिवे उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिला व युवतींना अनुक्रमे महिला कर्तृत्ववान व प्रेरणा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ. सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मायाताई कोसरे व सचिव रमेश ददगाल यांनी सांगितले.
महिला कर्तृत्ववान पुरस्कारात विदर्भातील सुपरिचित कवयित्री विद्या पिंजरकर, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी यांचा समावेश असून प्रेरणा पुरस्कारात चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे व अतिदुर्गम भागातील गडचांदुरच्या परिचारिका ऐश्वर्या मांदाडे यांचा समावेश आहे.
या पूर्वी देखील सहज सुचलंच्या अनेक सदस्यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व शाखेच्या वतीने सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याचे सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी सांगितले.

