Home Breaking News पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त घुग्घुसमध्ये अभिवादन कार्यक्रम

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त घुग्घुसमध्ये अभिवादन कार्यक्रम

99

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त घुग्घुसमध्ये अभिवादन कार्यक्रम

सुवर्ण भारत | पंकज रामटेके: सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर

घुग्घुस : आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रऋषी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून करण्यात आली. प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

या वेळी निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, लता आवारी, संदीप तेलंग, अजय लेंडे, उमेश दडमल, हेमंत कुमार, हनुमान खडसे, निखिल आत्राम, आकाश वेलादे, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, भारती परते, स्वाती गंगाधरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तर्फे करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी पंडितजींच्या ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानववाद’ या तत्त्वज्ञानाची आठवण करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.