Home Breaking News पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आ. किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आ. किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

128

पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आ. किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

सुवर्ण भारत | पंकज रामटेके – सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : महान तत्त्वचिंतक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथील आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. यावेळी भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष संतोष नूने यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचे स्मरण करीत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “पंडितजींची विचारसरणी ही केवळ सत्तेसाठी नव्हती, तर समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याच्या ध्येयासाठी होती. त्यांच्या ‘अंत्योदय’च्या तत्त्वज्ञानाने आजही आम्हाला प्रेरणा मिळते.”

पंडित उपाध्याय हे भारताला एक वैचारिक दिशा देणारे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाचा विकास, स्वदेशीचे महत्त्व, आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यावर भर देत भारतीय राजकारणाला नवा आयाम दिला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उपाध्याय यांच्या विचारांचा अमल करून ‘अंत्योदय’चे स्वप्न सत्यात उतरवले असल्याचेही संतोष नूने यांनी नमूद केले.

या अभिवादन कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये युवा संघटक प्रमुख (घुग्घुस-चंद्रपूर ग्रामीण) आशीषभाऊ मासिरकर, माजी सरपंच तसेच भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष संतोष नूने, महामंत्री इमरान खान, ज्येष्ठ नेते मल्लेश बल्ला, मुन्ना लोडे, सुरज मोरपका, गफ्फर, राजेंद्र लुटे, राजू नातर, रंजन मानकर, सुनिता पाटील, उज्वला उईके, नीतू जैस्वाल, अनिता गोवरधन, शारदा गोड्सेलवार, नीता मालेकर, विना गुछाइत, सुरेखा तोडासे, जयश्री राजूरकर, सविता गोहणे, किरण पाझारे, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे संयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पंडितजींच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प घेतला.