Home Breaking News • स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न!...

• स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न! • विद्या पिंजरकर,चंदा कामडी यांना महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार तर शिवानी झाडे,साक्षी वाडगूरे व ऐश्वर्या मांदाडेंना प्रेरणा पुरस्कार बहाल ! • आ. सुधीर मुनगंटीवार,आ.देवराव भोंगळे , श्रीराम पान्हेकर,संध्या गुरनूले, वनिता झाडे ,शैला चिमड्यालवार ,नंदू रणदिवे आदिं मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती!

462

• स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न!

• विद्या पिंजरकर,चंदा कामडी यांना महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार तर शिवानी झाडे,साक्षी वाडगूरे व ऐश्वर्या मांदाडेंना प्रेरणा पुरस्कार बहाल !

• आ. सुधीर मुनगंटीवार,आ.देवराव भोंगळे , श्रीराम पान्हेकर,संध्या गुरनूले, वनिता झाडे ,शैला चिमड्यालवार ,नंदू रणदिवे आदिं मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती!

चंद्रपूर : किरण घाटे

मूल : स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ मूल तालुक्यातील जानाळा येथे आज रविवार दि. 28 सप्टेंबरला दुपारी १२वाजता थाटात व उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनूले ,चंद्रपूर विकलांग संस्थेचे संस्थापक श्रीराम पान्हेकर, मूल नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे,जानाळा ग्राम पंचायतच्या सरपंच दर्शना किन्नाके, महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक,वनिता प्रमोद झाडे, मूल नगरीतील हाट स्पाॅट हाँटेलच्या संचालिका पोर्णिमा किर्तीवार, समाजसेविका नलिनी आडपवार,प्रशांत भरतकर, कल्पना मांदाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिला व युवतींना अनुक्रमे महिला कर्तृत्ववान व प्रेरणा पुरस्कार देवून गौरविण्यात आले .

विदर्भातील सुपरिचित कवयित्री तथा सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर व मूलच्या समाजसेविका चंदा कामडी यांना महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार तर चंद्रपूर येथील सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिका आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे व अतिदुर्गम भागातील गडचांदुरच्या परिचारिका ऐश्वर्या मांदाडे यांना प्रेरणा पुरस्कार बहाल करण्यात आला.

माझ्या ऐश्वर्याला हा पुरस्कार प्रथमच मिळाला! तो तिला निश्चित प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे मत त्यांच्या मातोश्री कल्पना मांदाडे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.

मायाताई कोसरे यांच्या संस्थेसाठी जेवढे आपणांस प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न आपण तनमनाने करू असे आश्वासन संध्याताई गुरनूले यांनी या वेळी बोलताना दिले .

हा पुरस्कार मला माझ्या कामाची दखल घेत मिळाला अशी भावना मूलच्या समाजसेविका चंदा कामडी यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.
तर चंद्रपूरच्या आर्किटेक्ट शिवानी झाडे व किनवटच्या सुप्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल झालेला हा पुरस्कार आमच्या साठी फार मोठा असून तो आम्हाला सदैव प्रेरणा देणारा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक- अध्यक्ष मायाताई कोसरे यांनी केले.त्यांनी आपल्या भाषणातून या नवनिर्मित संस्थेचा मुळ उद्देश सांगून ग्रामीण भागातील महिलांसाठी लघू उद्योग उद्योग सुरू करण्याचे या वेळी स्पष्ट केले.
सचिव रमेश ददगाल यांनी आपल्या भाषणातून मायाताई कोसरे यांच्या आज पावेतो केलेल्या समाज कार्याची तोंडभरून स्तुती केली.
आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ पदाधिकारी, सदस्यगण व विदर्भातील गणमान्य मंडळी उपस्थिती होती.

माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व उपस्थित महिलांना या वेळी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या .