Home Breaking News • लाचखोर सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना अटक • अहवाल पाठविण्यासाठी...

• लाचखोर सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना अटक • अहवाल पाठविण्यासाठी मागितले होतेय चक्क दोन लाख रुपये • एक लाख रुपये घेतले होते या पूर्वीच “या “लाचखोर अधिकाऱ्याने • 30 हजार रुपयांची लाच घेताना “हा “अधिकारी अडकला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात !

172

• लाचखोर सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना अटक
• अहवाल पाठविण्यासाठी मागितले होतेय चक्क दोन लाख रुपये
• एक लाख रुपये घेतले होते या पूर्वीच “या “लाचखोर अधिकाऱ्याने

• 30 हजार रुपयांची लाच घेताना “हा “अधिकारी अडकला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात !

चंद्रपूर : किरण घाटे

लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पूरेपूर कल्पना असताना देखील चंद्रपूर येथील जिल्हा
पुर्नवसन अधिकारी कार्यालयातील लाचखोर सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना लाचेचा मोह टाळता आला नाही.शेवटी हाच लाचखोर अधिकारी रविवारी तीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली.

दरम्यान चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या लाचखोर अधिकाऱ्याला अधिक चौकशी साठी ताब्यात घेतले असल्याचे समजते.प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पुर्नपडताळणी अहवाल पाठविण्यासाठी दोन लाख रुपयांची तक्रारदारास या लाचखोराने लाच मागितली होती.या आधी म्हणजे काही महिन्यांपूर्वी या लाचखोर अधिकाऱ्याने एक लाख रुपये घेतले होते .त्यानंतर काल तीस हजार रुपये घेताना हा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.
शिपाई ते सहायक महसूल अधिकाऱ्या पर्यंत नरेंद्र खांडेकर पदोन्नतीने पर्यंत पोहचले होते.सध्या ते जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात कार्यरत होते.
शासनाचा गलेलठ्ठ पगार असताना देखील या लाचखोर अधिकाऱ्याने तक्रारदास लाचेची मागणी केली.परंतु तक्रारदारास या लाचखोर अधिकाऱ्याला लाच द्यायची नव्हती अखेर त्याने स्थानिक एसीबीचे कार्यालय गाठत या लाचखोर अधिकाऱ्याची तक्रार नोंदवली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या लाचखोरास तीस हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडले.