मायाताई कोसरे यांनी घेतली माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट
चंद्रपूर : किरण घाटे
मूल तालुक्यातील जानाळा येथील स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष, नागपूरच्या समाजसेविका, योगशिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांनी सोमवारी दुपारी 1वाजता माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.
या वेळी संस्थेचे सचिव रमेश ददगाल व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तदवतचं या वेळी मायाताई कोसरे व रमेश ददगाल यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना एक लेखी निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.

