Home Breaking News वैशाली कोयचडेंचे अपघाती निधन ! • महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवारची भावपूर्ण...

वैशाली कोयचडेंचे अपघाती निधन ! • महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवारची भावपूर्ण श्रद्धांजली

70

• वैशाली कोयचडेंचे अपघाती निधन !

• महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवारची भावपूर्ण श्रद्धांजली

चंद्रपूर – प्रियंका गायकवाड

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून एखादी शासकीय नोकरी प्राप्त करावी हे वैशालीच स्वप्न होतं पण ते तिचं स्वप्न पूर्ण होवू शकलं नाही.

वैशाली कोयचडे ही MSRTC DIVISION office आस्थापनेत प्रशिक्षणार्थी एक गुणी व सर्व गुण
संपन्न मुलगी होती. तिच्या अकस्मात
अपघात निधनाची बातमी मनाला हेलावणारी ! ती बातमी कळताच मन सुन्न झालं!
सर्वांशी मिळून मिसळून असतांना स्मित हास्य असायचं. तिच्या परिवाराच्या आभाळमायेत होती तिची सागराची काया! जणू कल्पवृक्षाच्या सावलीत मिळत होती थंडगार छाया! किती उन्हाळे पहिले तिने किती पावसाळे पहिले परंतु तिच्या परिवाराच्या हृदयात आज किती अश्रुंचे साचले आहे तळे.! आज ऐकु येत आहे ग प्रत्येकाला तुझ्या काळजाची हाक तूझ्या आठवणींचा फुटला बांध कारण साठविले होते कितीतरी भाकीत स्वप्न एकाएकी झाला चुराडा. प्रत्येकाच्या डोळ्यात दिसेल अश्रुंचे टिपूस.. तू राहशील स्मृतीगंधानी नित्य दरवळत.. एक स्त्री म्हणून हास्य तुझे मोहक होते स्वभावाचे पैलू मायाळू मनाचे सार होते…
आता कितीतरी दूर असशील… आठवणीत सोडून गेलीस.
.. दिनक्रम दिवसरात्र सरत गेले तरी बहरलेले तूझ्या हास्याचे घरटे आता रिकामेच राहील तुझे स्वर मात्र गुंजेल….
तुझ्यावचून परिवाराचे श्वास चालेल पण जीव हरवले.. डोक्यावरचं छत्र हरपलं परिवार झाला सुन्न…
तूझ्या परिवाराच्या दुःखात
सहभागी सहज सुचलं परिवार
मनपूर्वक वाहते तुला श्रद्धांजली
उचलूनिया सारे दुःखाचा भार…
काळाने दिशा पालटली ती आपल्यात नाही.
———————————————
महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवारच्या एक सहमार्गदर्शिका शैला चिमड्यालवार यांच्यासह अनेकांनी दिवंगत वैशालीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.